Admission of 11th standard students was delayed due to delay in Maratha reservation
मराठा आरक्षणाच्या विलंबामुळे ११वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले

मराठा आरक्षण प्रकरणावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही, याचा परिणाम आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर होताना दिसतो आहे. १० सप्टेंबरला जाहीर होणारी दुसरी मेरिट लिस्ट आता कधी जाहीर होणार, याचा अंदाज ना शिक्षकांना आहे ना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना.

मुंबई : मराठा आरक्षण प्रकरणावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही, याचा परिणाम आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर होताना दिसतो आहे. १० सप्टेंबरला जाहीर होणारी दुसरी मेरिट लिस्ट आता कधी जाहीर होणार, याचा अंदाज ना शिक्षकांना आहे ना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना. सरकारी पातळीवरुन याबाबत निर्णय होत नसल्याने, ११ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अकरावीचे प्रवेश लांबणीवर पडल्याने त्याचा परिणाम पहिल्या सत्रावर होणार आहे.

महाराष्ट्र जूनियर कॉलेज शिक्षक असोसिएशनचे प्रो. मुकुंद आंधळे यांचे म्हणणे आहे की, सरकार प्रवेशाबाबत निर्णय कधी घेणार हे माहित नाही, पहिले सत्र तर हातातून गेल्यासारखेच आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु झाली तरी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. अकरावीत विद्यार्थ्यांचा होणारा अभ्यास हा पुढील शिक्षणाचा पाया मानला जातो. मात्र यंदा हा पायच डळमळीत राहण्याची शक्यता आहे. प्राथमिक शाळेतील मुलांचे ऑनलाईन क्लासेस सुरु झाले तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होईल, याचा अंदाजही अद्याप कुणालाच नाही. मराठा आरक्षणाबाबत अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय आलेला नाही, शिक्षण विभआगाचीतयारी पूर्म झालेली असून, सरकारच्या आदेशाची वाट पाहत आहोत, असे अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेशी संबंधित असलेलेया एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

राजकीय लाभासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

अल्पसंख्यांक ज्युनिअर कॉलेज असोसिएशनच्या एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की राजकीय लाभासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला का लावण्यात येते आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. अर्धे शैक्षणिक वर्ष संपले आहे. आता अर्धा अभ्यासक्रम रद्द केला तर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, आणि जर सुट्ट्या रद्द् केल्या तर शिक्षकांचे नुकसान होणार आहे. यात मुख्याध्यापकांना समस्यांना सोरे जावे लागणार आहे, कारण निर्णय त्यांना घ्यावे लागतील.

विद्यार्थी चिंतेत

दहावीत चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया रखडल्याने चिंतेत आहेत, आता प्रवेश कधी मिळणार, परीक्षा कधी होणार, याची चिंता त्यांना आणि पालकांना सतावते आहे. काही विद्यार्थ्यांनी तर पुस्तके विकत घेऊन अभ्यासही सुरु केला आहे. सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी विद्यार्थ्यांची आणि पालकांची मागणी आहे. हे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, एवढी पेक्षा विद्यार्थी सरकारकडून करीत आहेत.