अ‍ॅ. उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता? संजय राऊत यांच्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा

एकनाथ शिंदे भेटीनंतर राजकीय वर्तुळात शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असताना उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली असून मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही़ असं म्हटलं आहे.

    राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांची नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे. जळगाव दौऱ्यावर असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

    उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील जळगाव दौऱ्यावर असताना उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांना राजकारणात येण्याची ऑफर दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अ‍ॅ. उज्वल निकम यांना राज्यसभेवर पाठवण्याचा मानस होता. मात्र, अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांनी हा प्रस्ताव दोनवेळा नाकारला होता.

    उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रियाउज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

    एकनाथ शिंदे भेटीनंतर राजकीय वर्तुळात शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असताना उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली असून मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही़ असं म्हटलं आहे.