Affordability of Victoria drivers for 6 years; BJP's demand to rehabilitate 700 Victoria drivers has been the pride of Mumbai since British times

मुंबईतील व्हिक्टोरिया चालकांचा व्यवसाय गेल्या ६ वर्षांपासून बंद असून त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती खालावली असून त्यांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे व त्यासाठी आवश्यक धोरण लवकरात लवकर बनविण्यात यावे, अशी मागणी ऍड. नार्वेकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली.

  मुंबई : गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी परिसरात इंग्रजांच्या काळापासून  व्हिक्टोरिया चालविण्याचा व्यवसाय प्राणी मित्र संघटनांनी आक्षेप घेतल्याने गेल्या ६ वर्षांपासून सातशे व्हिक्टोरिया चालकांचा व्यवसाय बंद करण्यात आला. मात्र, याप्रकरणी न्यायालयाने आदेश देऊनही व्हिक्टोरिया चालकांना पर्यायी व्यवसाय देण्यासाठी राज्य सरकार व पालिकेने धोरण बनवावे आणि त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी भाजपाने स्थायी समितीच्या बैठकीत केली.

  सातशे व्हिक्टोरिया चालकांचे पुनर्वसनही करण्यात आलेले नाही, अशी तक्रार करीत भाजपचे नगरसेवक ऍड. मकरंद नार्वेकर यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली.

  मुंबईतील व्हिक्टोरिया चालकांचा व्यवसाय गेल्या ६ वर्षांपासून बंद असून त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती खालावली असून त्यांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे व त्यासाठी आवश्यक धोरण लवकरात लवकर बनविण्यात यावे, अशी मागणी ऍड. नार्वेकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली.

  २०१५ मध्ये मुंबईतील व्हिक्टोरिया

  चालकांचा व्यवसाय सरकारी व पालिका आदेशाने बंद करण्यात आला. सदर प्रकरण न्यायालयात गेले असता सरकार, पालिकेने या ‘व्हिक्टोरिया’ चालकांसाठी एक पर्यायी व्यावसायिक धोरण बनविण्याचे व त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आज ६ वर्षे उलटली तरी त्यांना पर्यायी व्यवसाय देण्यात आलेला नाही. त्यांच्यासाठी कोणतेही धोरण बनविण्यात आलेले नाही. तसेच, त्यांचे पुनर्वसनही करण्यात आलेले नाही, अशी कैफियत नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी यावेळी मांडली.

  मुंबईत ‘ई-  व्हिक्टोरिया’ सुरू करण्यात आली आहे. ७०० व्हिक्टोरिया चालकांपैकी केवळ ८ जणांनाच पर्यायी व्यवसाय उपलब्ध करण्यात आलेला आहे. मात्र उर्वरित व्हिक्टोरिया चालकांचे काय व कसे होणार, असा सवाल ऍड. मकरंद नार्वेकर यांनी यावेळी उपस्थित केला. मात्र जर ई-व्हिक्टोरिया सुरू केली असेल तर त्यांच्यासाठी लायसन्स काढले पाहिजे होते. जर लायसन्स नसेल तर याचाच अर्थ असा की, पालिका, सरकार यांच्याकडे पूर्वीच्या व्हिक्टोरियाबाबत आणि आताच्या “ई – व्हिक्टोरिया ” बाबत ठोस धोरणच नाही. त्यामुळे या ‘ इ – व्हिक्टोरिया ” चालकांच्या रोजीरोटीबाबत जी उदासीनता निर्माण झाली आहे, ती त्वरीत सोडून द्यावी,अशी सूचनाही ऍड. नार्वेकर यांनी यावेळी केली.