breast cancer

एका सर्वेक्षणानुसार कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये अनेक कर्करोग रुग्णांची परवड झाल्याचे समोर आले आहे. हे सर्वेक्षण मुंबईतील अपेक्स ब्रेस्ट कॅन्सर क्लीनिककडून करण्यात आले. यावर लॅप्रोस्कॉपीक शल्यविशारद डॉ. अदिती अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यात अनेक कर्करोग रूग्णांनी कोरोना संक्रमणाच्या भीतीने पुढे ढकलल्या. त्यामुळे अनेक रुग्णांना याचा त्रास होताना दिसत आहे.

मुंबई : कोरोनाच्या सुरुवातीच्या महिन्याच्या तुलनेत आता हळूहळू इतर आजाराचे रुग्ण तपासणीसाठी येत असून शस्त्रक्रिया ही वाढू लागल्या आहेत. असे असले तरी आजही उपचारात पुरेसा वेग नसल्याचे समोर येत आहे. यामुळे कर्करोग रुग्णाची (cancer patients) परवड (Affordability) होताना दिसत आहेत.

एका सर्वेक्षणानुसार कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये अनेक कर्करोग रुग्णांची परवड झाल्याचे समोर आले आहे. हे सर्वेक्षण मुंबईतील अपेक्स ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) क्लीनिककडून करण्यात आले. यावर लॅप्रोस्कॉपीक शल्यविशारद डॉ. अदिती अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यात अनेक कर्करोग रूग्णांनी कोरोना संक्रमणाच्या भीतीने पुढे ढकलल्या. त्यामुळे अनेक रुग्णांना याचा त्रास होताना दिसत आहे. ऑक्टोबर हा महिना ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) अवेरनेस म्हणजेच स्तनाच्या कर्करोगाबाबत ( women cancer patients) जागरुकता आणण्यासाठी पाळला जातो. यासाठी पश्चिम उपनगरात महिलांचे एक मोफत सल्ला शिबीर (ऑनलाईन ) व एक सर्वेक्षण केले असल्याचे डॉ. अग्रवाल म्हणाल्या.  या सर्वेक्षणात मालाड ते पालघर मधील महिलांशी फोनवर बोलून त्यांच्या समस्या जाणवून घेतल्या असता अनेक महिलांनी कर्करोगाची ठळक लक्षणे आढळून आली असतानाही लॉकडाउन असल्यामुळे पुढील तपासणी अथवा उपचार घेतले नसल्याचे सांगितले.

नालासोपारा येथे राहणाऱ्या एका महिलेला मे महिन्यात डाव्या स्तनामध्ये ३ सेन्टीमीटरची गाठ आढळून आली होती, परंतु वाहतुकीची साधने नसल्यामुळे तिने पुढील उपचार केले नाही, तीन महिन्यांनी जेंव्हा ती उपचारासाठी आली  तेंव्हा ही गाठ डबल आकाराची झाली होती. एक कर्करोगग्रस्त महिलेने वाहतुकीची सोय नसल्यामुळे रेडिओथेरेपी थांबविल्याचे सांगितले. तर एक मुलगी आपल्या भावासोबत लॉकडाउन काळामध्ये रेडीएशन थेरपी घेण्यासाठी जात होती, परंतु तिच्या आईला कोरोना झाल्याने तिने आपली उपचार ही थांबविले. कारण तिला १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले गेले होते. अशा अनेक कारणांमुळे रुग्ण महिलांशी बोलून त्यांना आपले उपचार परत सुरु करण्यास सांगितले तसेच अनेक महिलांना आम्ही रोज फोनवरून समुपदेशन करण्यात येत आहेत.

कर्करोग हा आता पूर्वीसारखा गंभीर आजार राहिलेला नाही कारण भारतामध्ये अनेक आधुनिक उपचार उपलब्ध असून कर्करोगावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य झाले आहे परंतु भीती व लाजेपायी आजही ६० टक्के रुग्ण अंतिम टप्प्यामध्ये कर्करोग आल्यानंतर डॉक्टरकडे येतात, अशावेळी त्यांच्यावर उपचार करणे कठीण होऊन जाते. लॉकडाउन काळामध्ये कर्करोगच नाही तर अनेक गंभीर रोगांवर दुर्लक्ष झाले आहे याच सामाजिक जाणिवेतून  अपेक्स ब्रेस्ट कॅन्सर क्लीनिकतर्फे आम्ही हा उपक्रम राबविला असून अनेक महिलांना ऑनलाईन तसेच फोनवर मार्गदर्शन केले जात आहे.