मादाम कामा वसतीगृहातील अफगाणी विद्यार्थिनींची गैरसोय- युवासेनेने दिला मदतीचा हात

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मादाम कामा वसतिगृहात अफगाणिस्तान येथील चार विद्यार्थिनी लॉकडाऊनमुळे अडकून पडल्या आहेत. या विद्यार्थिनींना काही दिवसांपासून जेवणाची गैससोय होत आहे. याकडे अधिसभा

 मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मादाम कामा वसतिगृहात अफगाणिस्तान येथील चार विद्यार्थिनी लॉकडाऊनमुळे अडकून पडल्या आहेत. या विद्यार्थिनींना काही दिवसांपासून जेवणाची गैससोय होत आहे. याकडे अधिसभा सदस्य शीतल देवरुखकर-शेठ यांनी लक्ष वेधले. तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर आजयुवासेनेने या विद्यार्थिनींना धान्य पुरवठा केला.

लॉकडाउनच्या काळात मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात काही विद्यार्थी अडकून पडलेले आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. मादाम कामा वसतिगृहात जास्त विद्यार्थिनी होत्या. मात्र काही विद्यार्थिनी परवानगी घेऊन आपल्या मूळ गावी गेल्या.  आता अफगाणिस्तानमधील चारच विद्यार्थिनी राहत असून या विद्यार्थिनींच्या जेवणाची गैरसोय होत आहे. याबाबत युवा सेनेच्या अधिसभा सदस्य शीतल देवरुखकर-शेठ यांनी विद्यापीठाकडे १४ मे रोजी तक्रार केली. मात्र याकडे लक्ष न पुरवल्याने अखेर शीतल यांच्या सूचनेनुसार कुलाबा विधानसभा विभाग अधिकारी प्रथमेश सकपाळ व युवासैनिक पवन धोत्रे, यश काते, स्वप्निल महाडिक यांच्या मार्फत एक महिन्याच अन्नधान्य, भाज्या व फळ फळावळ पुरवले. यामुळे या विद्यार्थिनींना दिलासा मिळाला आहे.