तब्बल ५६ तासांनंतर मुंबईतील सिटी मॉलची आग आटोक्यात, अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरूच

मुंबई सेंट्रल (Mumbai Central) परिसरातील सिटी मॉलमध्ये (City Mall) लागलेल्या आगीवर तब्बल रविवारी (Sunday) पहाटे नियंत्रण मिळवण्यात यश आले. गुरुवारी रात्री उशिरा लागलेली आग सुमारे ५६ तासांपासून धुमसत होती. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन ( fire brigade started cooling operation) सुरू करण्यात आले.

मुंबई : मुंबई सेंट्रल (Mumbai Central) परिसरातील सिटी मॉलमध्ये (City Mall) लागलेल्या आगीवर तब्बल रविवारी (Sunday) पहाटे नियंत्रण मिळवण्यात यश आले. गुरुवारी रात्री उशिरा लागलेली आग सुमारे ५६ तासांपासून धुमसत होती. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन ( fire brigade started cooling operation) सुरू करण्यात आले. दरम्यान मॉलमधील अनेक साहित्य जळून खाक झाले आहे. या कालावधीत अग्निशमन दलाचे सहा जवान जखमी झाले.

मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकल्याने संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला होता. दुकानात मोबाईल फोनच्या बॅटरी, चार्जर आणि वायर यांसारख्या अनेक ज्वलनशील वस्तू असल्याने ही आग दीर्घकाळ धुमसत होती. चार मजली संपूर्ण मॉल जळून खाक झाला असून यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.