Deepika, Sara, Shraddha refuse to take drugs,

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा(Bollywood drugs connection) तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरा अर्थात एनसीबीची(ncb) कारवाई आणखी तीव्र होत चालली आहे. आता तीन अभिनेत्यांवर कारवाईचा फास आवळला जाणार आहे. एनसीबीच्या रडारवर तीन मोठे अभिनेते आहेत आणि त्यांचे फोन सर्वेलान्सवर ठेवले आहेत.

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा(Bollywood drugs connection) तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरा अर्थात एनसीबीची(ncb) कारवाई आणखी तीव्र होत चालली आहे. आता तीन अभिनेत्यांवर कारवाईचा फास आवळला जाणार आहे. एनसीबीच्या रडारवर तीन मोठे अभिनेते आहेत आणि त्यांचे फोन सर्वेलान्सवर ठेवले आहेत. करण जोहरच्या पार्टीमध्ये अभिनेत्यासह १२ सेलिब्रिटी सहभागी झाले होेते. त्यांनी ड्रग्जचे सेवन केल्याची चर्चा आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याचा प्रकार आता ड्रग्ज कनेक्शनपर्यंत पोहचला आहे. एनसीबीने आतापर्यंत दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची चौकशी केली आणि त्यांचे फोन जप्त केले. एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि धर्मा प्रॉडक्शनचा माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादसह १९ आरोपींना अटक केली आहे. अभिनेत्रींनंतर आता बॉलिवूडमधील नामांकित अभिनेते एनसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. एनसीबी अभिनेत्यांच्या ड्रग्ज कनेक्शनसंबंधी पुरावे गोळा करण्यात गुंतली आहे. त्यांचे फोन सर्विलांसवर टाकले आहेत आणि त्यांच्या हालचालीवर बारकाईने नरज ठेवली जात आहे. बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनचे तार दुसऱ्या शहरांमध्ये, राज्यांमध्ये जोडले असल्याची शक्यता आहे. एनसीबीने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. अहमदाबाद, इंदौर, चेन्नई आणि बंगळुरूमधून अतिरिक्त टीम बोलवण्यात आली आहे.

एनसीबीचे २० अधिकारी कोरोनाग्रस्त
सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी सुरू केली आहे. एनसीबी ड्रग्ज कनेक्शनसंबंधी लोकांची चौकशी करत आहे. त्यातच कोरोना असल्यामुळे त्याचा परिणाम अधिकाऱ्यांवरही होत आहे. एनसीबीचे २० अधिकारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. एनसीबीच्या टीमचा पहिला अधिकारी १६ सप्टेंबरला कोरोनाग्रस्त झाला होता.

सुशांतच्या मृत्यूचा अहवाल सीबीआयकडे सुपूर्द
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एम्सने सीबीआयला अहवाल सादर केल्यानंतर सीबीआयची टीम पुन्हा तपासाला लागली असून या सीबीआयकडून अहवालाची समीक्षा सुरू झाली आहे. त्यानंतर सुशांतने आत्महत्या केली होती की त्याची हत्या होती, यावरून पडदा उघडेल. या हाय प्रोफाईल प्रकरणावर सर्वांची नजरे आहेत आणि देशातील जनता सत्य काय आहे, हे जाणू इच्छित आहे. असे असले तरी एम्सच्या फॉरेन्सिक अहवालातून विशेष काही निष्पन्न होणार नाही, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एम्सची टीम व सीबीआय मृत्यूच्या कारणांवर असहमत
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने एम्सच्या डॉक्टरांची समिती स्थापन केली होती. या समितीने मुंबईतील कूपर हॉस्पिटलने दिलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट तपासला. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी सोमवारी अंतिम अहवाल सीबीआयला सादर केला. त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. सुशांतचा खून झाल्याचे यातून निष्पन्न होत नसल्याचे एम्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप अंतिम अहवाल येणे बाकी आहे. पाच सदस्यांच्या मेडिकल बोर्डाचे सदस्य डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी कायदेशीर बाबींवर विचार करण्याची गरज आहे. डॉ. गुप्ता यांनी याआधीच सांगितले होते की, एम्सच्या अहवालावर कोणत्याही प्रकारची शंका नाही. एम्सची टीम व सीबीआय सुशांतच्या मृत्यूच्या कारणांवर सहमत नसल्याचे समजते.

भाजपचे तोंड काळे होण्याची प्रक्रिया सुरू; काँग्रेसची टीका
अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी ‘एम्स’ने दिलेल्या अहवालानंतर काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. भारतीय जनता पक्षाचे तोंड काळे होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी बोचरी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. एम्सच्या अहवालाच्या अनुषंगाने सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुंबई पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासावर व राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय उपस्थित करत भाजपने सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत संपर्क साधला होता. सुशांतच्या प्रकरणात घातपाताची कुठलीही शक्यता दिसत नसल्याचे आता ‘एम्स’ने स्पष्ट केल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे.