आर्यन खाननंतर करण जोहर एनसीबीच्या रडारवर, जुना व्हीडिओ येणार नव्याने समोर

एक वर्षापूर्वी एका पार्टीतील करण जोहर याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता, त्याची चौकशी अजून सुरु आहे. एनसीबीने करण जोहरचे व्हीडिओ प्रकरण बंद केलेले नाही. त्यामुळं आर्यन खान याच्यानंतर बॉलिवूड मंडळीतील करण जोहर हा एनसीबीच्या निशाण्यावर असणार आहे. हे प्रकरणाची आम्ही पुन्हा एकदा कसून तपासणी आणि चौकशी करणार असल्याचं एनसीबीने म्हटले आहे.

    मुंबई : आर्यन खान याच्यानंतर निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर एनसीबीच्या रडारवर आहे. एक वर्षापूर्वी एका पार्टीतील करण जोहर याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता, त्याची चौकशी अजून सुरु आहे. एनसीबीने करण जोहरचे व्हीडिओ प्रकरण बंद केलेले नाही. त्यामुळं आर्यन खान याच्यानंतर बॉलिवूड मंडळीतील करण जोहर हा एनसीबीच्या निशाण्यावर असणार आहे. हे प्रकरणाची आम्ही पुन्हा एकदा कसून तपासणी आणि चौकशी करणार असल्याचं एनसीबीचे रीजनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.

    हा व्हीडिओ स्वत: करण जोहर याने सोशल मीडियावर शेअर केला होता. या पार्टीत सेलेब्स ड्रग्ज घेतल्याचे बोलले जात होते. परंतू असे आरोप झाल्यानंतर करण जोहर यांने या पार्टीत कुणीही ड्रग्ज घेतले नाही असा खुलासा करण जोहर याने केला होता.  दरम्यान सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर याची चौकशी करण्यात आली होती, त्यानंतर याची चौकशी थांबली होती.

    पुढील सहा महिने होणार चौकशी

    आगामी काळात पुढील ६ महिने बॉलिवूडमधील मंडळी एनसीबीच्या रडारवर असतील असं समीर वानखेडे यांनी म्हटले आहे, तसे त्यांनी याबाबत केंद्राला सुद्धा माहिती दिली आहे. या पुढील काळात निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याच्या पार्टीतील व्हीडिओची आम्ही चौकशी करणार आहोत. या पार्टीत अभिनेता रणबीर कपूर, विक्की कौशल, वरूण धवन, अभिनेत्री मलाइका अरोरा दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, शाहीद कपूर, दिग्दर्शनक अयान मुखर्जी आदी मंडळी या व्हीडिओत दिसत आहेत. हा व्हीडिओ २८ जुलै २०१९ रोजीचा असल्याचे समोर आले आहे.

    समीर वानखेडे यांच्या निशाण्यावर बॉलिवूड

    समीर वानखेडे हे पुढील सहा महिने बॉलिवूडमधील मंडळींची चौकशी करणार असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अमली पदार्थ, ड्रग्ज आणि बॉलिवूडमधील “गँग ऑफ गांजापूर” मंडळी प्रकाशात आली होती. दरम्यान करण जोहरच्या तो व्हायरल पार्टीतील व्हिडिओची सुद्धा कसून चौकशी केली जाणार असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. कारण त्या पार्टीत सहभागी सेलेब्स हे अजून सुद्धा NCBच्या रडारवर आहेत.

    रिया, अरमान आणि आर्यन यांचा ड्रग्जशी संबंध

    NCB च्या म्हणण्यानुसार रिया और शौविक चक्रवर्ती, अरमान कोहली आणि आर्यन ड्रग्स याच्या ड्रग्जच्या केसमध्ये या तिघांचा संबंध असल्याचे दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण पेडलर नेटवर्क, तसेच ड्रग्ड सप्लायर्स हा या तिघांना ओळखतो, आणि हे तिघांच्या ड्रग्जच्या केसमध्ये अगदी जवळच संबंध असल्याचे बोलले जात आहे.