
औरंगाबादनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे. यावरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये पून्हा जुंपणार आहे.
मुंबई : औरंगाबादनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे. यावरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये पून्हा जुंपणार आहे.
मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून औरंगाबाद शहराचा संभाजीनगर उल्लेख झाल्यावर प्रचंड गदारोळही झाला होता. आता पुन्हा एकदा या नामांतराच्या मुद्द्याला फोडणी मिळाली.
CMO कडून उस्मानाबाद शहराचा उल्लेख धाराशीव असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे CMOने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा फोटो आहे. अमित देशमुख हे काँग्रेसचे नेते असल्यानं काँग्रेसला हे मान्य आहे का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. (Dharashiv Mentions Osmanabad On CM Twitter Handle)
‘धाराशिव-उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करणे,’ असं सीएमओनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यावरून आता काँग्रेसची कोंडी झालीय.