भाजपाला राम राम करून ‘या’ नेत्याने  ‘मनसे’चे इंजिन चालवण्यास केली सुरुवात

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. नितीन काळे यांनी राजा ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. काळे यांच्यामुळे कळंबोलीत मनसेला अधिक ताकद पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

    नवी मुंबई: कोरोना काळातही राज्यात राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडामोडी घडत आहेत. नवी मुंबईत भाजपचे कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत भाजपाला राम राम केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. नितीन काळे यांनी राजा ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. काळे यांच्यामुळे कळंबोलीत मनसेला अधिक ताकद पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    राज ठाकरे यांनी नितीन काळे याचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातही काही महिन्यांपूर्वी शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचं पाहायला मिळालं होतं. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला. तत्पूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला होता. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता.