ब्रिटननंतर आता दक्षिण आफ्रिकेतील खतरनाक कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव; मुंबईजवळ तीन रुग्ण सापडल्याने खळबळ

ब्रिटननंतर आता दक्षिण आफ्रिकेतील खतरनाक कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याने काळजी वाढली आहे. मुंबईजवळ तीन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. खारघर येथील टाटा मेमोरियल केंद्रामध्ये कोरोनाचा हा नवा म्युटेंट आढळून आला आहे. या म्युटेशनला ई४८४के या नावाने ओळखले जाते.

मुंबई : ब्रिटननंतर आता दक्षिण आफ्रिकेतील खतरनाक कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याने काळजी वाढली आहे. मुंबईजवळ तीन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. खारघर येथील टाटा मेमोरियल केंद्रामध्ये कोरोनाचा हा नवा म्युटेंट आढळून आला आहे. या म्युटेशनला ई४८४के या नावाने ओळखले जाते.

टाटामधील वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, नव्याने आढळलेला हा विषाणू हा दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराशी संबंधित आहे. हा विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या (के४१७एन, ई४८४के आणि एन५०१वाय) या तीन म्युटेशनमधून आला आहे.

केंद्रातील तज्ज्ञांच्या चमूने ७०० कोविड नमुन्यांची शास्त्रीय पद्धतीने पडताळणी केली. यापैकी तीन नमुन्यांमध्ये हा म्युटेंट आढळला. कोविडच्या या म्युटेंटवर जुन्या विषाणूमुळे शरीरात तयार झालेल्या तीन अँटिबॉडी (प्रतिपिंड) यावर प्रभावहीन असल्याने चिंतेत भर पडली.

असे असले तरी हा नवा विषाणू कमी धोकादायक असल्याचे मत जागतिक पातळीवरील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. त्यामुळे कोरोनाविषयी भीती न बाळगता संपूर्णतः खबरदारी बाळगल्यास धोका कमी करता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.