corona

मागील आठवड्याभरातील काेराेना रुग्णसंख्या(corona patients in Mumbai) पाहता मुंबईत प्रत्येक मिनिटाला ४ नवीन रुग्ण सापडत आहेत. यामुळे मुंबईकरांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका आराेग्य विभागाने केले आहे.

    नीता परब, मुंबई: मुंबईत काेराेनाची दुसरी लाट(corona second wave in Mumbai) पूर्णपणे येवून ठेपली आहे. मुंबईत दरराेज कोराेनाचे मिळणारे रुग्ण पाहता, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या वाढतच असल्याचे समाेर येत आहे. रविवारी मुंबईत कोराेना रुग्णांची संख्या सात हजाराच्या आसपास पाेहोचली आहे. मागील आठवड्याभरातील काेराेना रुग्णसंख्या पाहता मुंबईत प्रत्येक मिनिटाला ४ नवीन रुग्ण सापडत आहेत. यामुळे मुंबईकरांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका आराेग्य विभागाने केले आहे.

    मागील आठवडाभरात कराेना झपाट्याने पसरत आहे. पालिका आराेग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, २१ मार्चला काेराेनाचे ३७७५ नवीन रुग्ण आढळून आले हाेते, तर २८ मार्चला रुग्णसंख्या पुन्हा वाढली व ६९२३ पर्यंत रुग्णसंख्या पाेहोचली. येत्या काही दिवसात काेराेना रुग्णसंख्या दहा हजाराचा टप्पा गाठेल असे संकेत काही दिवसांपूर्वी पालिका आराेग्य विभागाने घेतलेल्या एका बैठकीत वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

    ८ दिवसात आढळून आले ४० हजार नवीन रुग्ण

    मुंबईत काेराेना व्हायरस वेगाने पसरत आहे. कोराेनाच्या दुसऱ्या लाटेचे हे संकेत असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केवळ आठ दिवसात ३९७९५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले की,‘‘ पालिका प्रशासनाने चाचणी संख्या दुप्पट केली आहे. मुंबईत सध्या ४५ हजारपेक्षा अधिक नागरिकांची काेराेना चाचणी केली जात आहे. ज्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. यात ८५ टक्के रुग्णांमध्ये काेणतीही लक्षणे नसल्याचे आढळून येत आहे तर उर्वरित रुग्णांची पालिका प्रशासन याेग्य ती काळजी घेत आहे. तर मागील अाठ दिवसात साधारण ७० जणांचा कराेनामुळे मृत्यू झाला आहे.