गणरायापाठोपाठ गौराईचेही घरोघरी शुभ आगमन

गणेशोत्सवात महिला वर्ग ज्यांची आतुरतेने वाट बघत असतात, त्या गौरीमातेचे आज सर्वत्र ठिकठिकाणी उत्साहात आगमन झाले. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने ढोल-ताशांच्या गजराशिवाय अगदी साध्या पद्धतीने पण भक्तिमय वातावरणात गौरीमातेची गाणी म्हणत गौरीमातेचे आगमन करण्यात आले.

    मुंबई : गणरायापाठोपाठ गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे. अनेक ठिकाणी गौरीला महालक्ष्मी असेही संबोधले जाते. गौरींचे आगमण झाल्यानंतर घरोघरी पारंपारिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला.

    गणेशोत्सवात महिला वर्ग ज्यांची आतुरतेने वाट बघत असतात, त्या गौरीमातेचे आज सर्वत्र ठिकठिकाणी उत्साहात आगमन झाले. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने ढोल-ताशांच्या गजराशिवाय अगदी साध्या पद्धतीने पण भक्तिमय वातावरणात गौरीमातेची गाणी म्हणत गौरीमातेचे आगमन करण्यात आले.

    महाराष्ट्रात सर्वत्र गौरी स्थापना होत असली तरी तिच्या आगमनाच्या परंपरेमध्ये आपल्याला विविध ठिकाणी साम्य दिसून येते. अशीच वरणगाव येथे गौरीचे आगमन करण्यात आले.