केईएम हॉस्पिटलनंतर आता नायर हॉस्पिटलमध्ये कोरोना वॅक्सीनची चाचणी सुरु

मुंबई: मागील आठवड्यात पालिकेच्या केइएम रुग्णालयात कोरोना वॅक्सीनची चाचणी सुरु करण्यात आली, आता या पाठोपाठ नायर हॉस्पिटल मधे देखील कोरोना वॅक्सीनची चाचणी सुरु जाली आहे. तीन वालंटियर्सना वॅक्सीनचा डोस देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. तसेच अजुन २० वालंटियर्सना वैक्सिनसाठी फिट असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी विकसित आणि पुणे स्थित सिरम इंस्टीट्युट द्वारा निर्मित कोरोना वैक्सीन फेज २ आणि फेज ३ ची चाचणी पालिकेच्या नायर आणि केइएम होस्पिटलमधे सुरु जाली आहे. मागील आठवड्यात केइएममधे ३ वालंटियर्सना वॅक्सीन देण्यात आली तर आज नायरमधे ३ वालंटियर्सना वैक्सीनचा डोस देण्यात आला. याशिवाय उर्वरित १७ जणां पैकी काही जणांना येत्या काही दिवसात क्रमाक्रमाने डोस दिला जाणार आहे. या १७
वालंटियर्सची आरटीपीसीआर आणि इतर चाचण्या ही निगेटिव्ह आल्या आहेत, ज्यामुळे येत्या काही दिवसात उर्वरित वालंटियर्सना डोस दिला जाणार असल्याचे नायर हॉस्पिटलचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले, वैक्सीन दिल्यानंतर पुढील 6 महीने वालंटियर्सच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाणार असल्याचे ही सांगण्यात आले.