मलिकांच्या आरोपांनंतर नेटकऱ्यांनी #SameerWankhede ट्रेंड करत, वानखेडेंना दिला पाठिंबा, लिहिले ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’

नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर बॉलिवूड सेलेब्सकडून पैसे उकळण्यासाठी मालदीवमध्ये गेल्याचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे निवेदन दिले आहे, त्यानंतर आता सोशल मीडियावर नेटकरी समीर वानखेडे यांच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत, #SameerWankhede ट्रेंड करत, वानखेडेंना दिला पाठिंबा, लिहिले 'आम्हाला तुमचा अभिमान आहे'

    मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर बॉलिवूड सेलेब्सकडून पैसे उकळण्यासाठी मालदीवमध्ये गेल्याचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे निवेदन दिले आहे, त्यानंतर आता सोशल मीडियावर नेटकरी समीर वानखेडे यांच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत.


     

    वानखेडेंच्या समर्थनार्थ #SameerWankhede ट्विटरवर ट्रेंड

    नेटकरी #SameerWankhede शुक्रवारी ट्विटरवर ट्रेंड करत आहे. या हॅशटॅगवर अवघ्या काही तासांत हजारो ट्विट्स करण्यात आले आहेत. काही लोक बॉलीवूड सेलेब्सचे सत्य समोर आणण्यासाठी समीर वानखेडे यांना नायक म्हणत आहेत, तर काही लोक त्यांच्यासाठी सुरक्षेची मागणी करत आहेत. अशाच एका नेटकऱ्यांने भारत सरकारला आवाहन केले आणि लिहिले, “भारत सरकारने समीर वानखेडेला झेड प्लस सुरक्षा द्यावी. नवाब मलिक वानखेडे यांना सतत धमकावत आहेत. सुरक्षा कुठे आहे. जनता त्याच्यासाठी सुरक्षेची मागणी करते.”

    एका नेटकऱ्याने लिहिले की, “संपूर्ण देशाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा अभिमान आहे. धन्यवाद समीर वानखेडे.” दुसऱ्याने लिहिले की, “समीर वानखेडे हे एकमेव अधिकारी आहेत ज्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी जगभरात ओळखले जात आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्यूरो आणि पीएमओ इंडिया, समीर वानखेडे यांना सुरक्षित ठेवा. ते खरोखरच देश आणि अनिवासी भारतीयांसाठी सकारात्मक राजदूत आहेत.”

    काय आहेत नवाब मलिक यांचे आरोप 

    कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी अलीकडेच समीर वानखेडेंवर आरोप केला आहे की, कोरोनाकाळात बॉलिवूड सेलेब्सकडून पैसे उकळण्यासाठी मालदीवला गेले होते. यावर, समीर यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, आपण सरकारकडून रजेवर गेल्या वर्षी कुटुंबासह मालदीवला गेलो होतो. ते म्हणाले की, “मी एक छोटा सरकारी नोकर आहे, जर नवाब मलिक ड्रग्ज डीलर्स, ड्रग्ज अॅडिक्टस आणि विक्रेत्यांवर कारवाई करून इतके दुखावले गेले असतील, आणि त्यांनी मला तुरुंगात पाठवायचे असेल, तर मी त्यांना शुभेच्छा देतो.” असं वानखेडे म्हणालेत.