After Mulund, Deonar and Kanjur dumping will also be stopped? BMC finds alternative Mumbai dumping ground free

नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे मुंबई उपनगरांतील मुलुंड येथील डंपिंग ग्राऊंड महापालिकेने बंद केले. मात्र अजूनही कांजूरमार्ग व क्षमता संपलेले देवनार डंपिंग ग्राऊंड अजूनही सुरु आहे. हे डंपिंग ग्राऊंडही बंद करून तळोजा येथील पालिकेच्या ताब्यात असलेल्या 30 हेक्टर जमिनीवर कचऱ्यावर प्रक्रिया करून खत आणि वीज निर्मिती करावी व मुंबईला डंपिंग ग्राऊंड मुक्त करावे अशी मागणी सातत्याने केली जाते आहे.

    मुंबई : मुंबईतील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी नवी मुंबईतील तळोजा येथे 52 हेक्टर जागा घेण्यात आली असून 30 हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे, तर 22 हेक्टर जागा ताब्यात यायची आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतची प्रक्रिया सुरु असून मुंबईतील संपूर्ण कचरा टाकण्यासाठी तळोजा डंपिंग ग्राऊंड उपलब्ध केले जाणार आहे. त्यामुळे देवनार व कांजूर डंपिंग बंद करून मुंबई लवकरच डंपिंग ग्राऊंड मुक्त होण्याची शक्यता आहे.

    नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे मुंबई उपनगरांतील मुलुंड येथील डंपिंग ग्राऊंड महापालिकेने बंद केले. मात्र अजूनही कांजूरमार्ग व क्षमता संपलेले देवनार डंपिंग ग्राऊंड अजूनही सुरु आहे. हे डंपिंग ग्राऊंडही बंद करून तळोजा येथील पालिकेच्या ताब्यात असलेल्या 30 हेक्टर जमिनीवर कचऱ्यावर प्रक्रिया करून खत आणि वीज निर्मिती करावी व मुंबईला डंपिंग ग्राऊंड मुक्त करावे अशी मागणी सातत्याने केली जाते आहे.

    सध्या मुंबईत सुमारे 6500 ते 6800 मेट्रिक टन कचरा तयार होतो. देवनार डंपिंग ग्राऊण्डची कचरा सामावू घेण्याची क्षमता आठ वर्षांपूर्वीच संपली आहे. कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपल्यानंतर मुंबईचा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला होता.