नारायण राणेंच्या भेटीनंतर शिवसेनेकडून बाळासाहेबांचा स्मृतीस्थळाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण; Narayan Rane Jan Ashirwad Yatra

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बहुचर्चित जन आशीर्वाद यात्रा(Narayan Rane Jan Ashirwad Yatra) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नारायण राणे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याची माहिती समोर येत आहे(Shiv Sena purified Balasaheb's memorial).

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बहुचर्चित जन आशीर्वाद यात्रा(Narayan Rane Jan Ashirwad Yatra) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नारायण राणे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याची माहिती समोर येत आहे(Shiv Sena purified Balasaheb’s memorial).

    या शुद्धीकरमामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचो दर्शन घेवून केली. त्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी केलेल्या प्रवासात भाषणावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

    यावर प्रत्युत्तर देत काही शिवसैनिकांनी राणे यांच्या भेटीनंतर शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीसथळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. यानंतर यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवसैनिकांच्या या कृत्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेनेलाच शुद्धीकरणाची गरज असल्याची टीका भाजपा नेते आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

    नारायण राणेंनी दर्शन घेतल्यानंतर असे केले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण – पाहा व्हिडिओ