महाराष्ट्र आणि मध्य भारतात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर मान्सूनची उत्तरेकडे वाटचाल

महाराष्ट्र आणि मध्य भारतात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तरेकडे वेगाने वाटचाल सुरू केली आहे. मान्सूनने रविवारी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगालच्या अनेक भागांत दमदार हजेरी लावली. त्यानंतर दिल्ली, हरियाणा आणि पंजाबपर्यंत धडक मारणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

    मुंबई : महाराष्ट्र आणि मध्य भारतात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तरेकडे वेगाने वाटचाल सुरू केली आहे. मान्सूनने रविवारी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगालच्या अनेक भागांत दमदार हजेरी लावली. त्यानंतर दिल्ली, हरियाणा आणि पंजाबपर्यंत धडक मारणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

    त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण देशाला व्यापणार आहे. महाराष्ट्रात 5 जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत मान्सूनने संपूर्ण राज्याला व्यापले होते. मुंबईत तर मान्सूनने दमदार आगमन करत मुंबईकरांना पुरते झोडपून काढले होते. यानंतर आता मान्सूनने उत्तरेकडे प्रवास सुरू केला आहे. दरम्यान, ईशान्य भारतातील बऱ्याच राज्यात पावसाने हजेरी लावली होती.

    मान्सूनने महाराष्ट्रातून पुढच्या दिशेने मार्गक्रमण केले असले तरी राज्यात अद्याप बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. तर कोकणात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पुढील चार दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

    हे सुद्धा वाचा