…अखेर सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोनिकाच्या वडिलांची इच्छा पूर्ण

हा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर (After six years  later) मोनिकाच्या (Monica)दोन्ही हातांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शुक्रवारी ग्लोबल रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. दोन्ही हात प्रत्यारोपित करणारी ही मुंबईतील पहिली शस्त्रक्रिया आहे. तसेच मोनिकाला शनिवारी डिस्चार्ज (Discharge) मिळाला. यावेळी 'खरेखुरे हात लागावेत, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती, परंतु त्यांचा दीड वर्षांपूर्वी मृत्यू झाला. आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.

मुंबई : सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर (After six years  later) मोनिकाच्या (Monica)दोन्ही हातांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शुक्रवारी ग्लोबल रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. दोन्ही हात प्रत्यारोपित करणारी ही मुंबईतील पहिली शस्त्रक्रिया आहे. तसेच मोनिकाला शनिवारी डिस्चार्ज (Discharge) मिळाला. यावेळी ‘खरेखुरे हात लागावेत, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती, परंतु त्यांचा दीड वर्षांपूर्वी मृत्यू झाला. आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाले (Father’s wish came true) , असे सांगताना ती भावनाविवश झाली.

जानेवारी २०१४ मध्ये रेल्वे अपघातात (Railway accident) मोनिकाचे दोन्ही हात गेले होते. तेव्हापासून कृत्रिम हातांनी दैनंदिन व्यवहार करणाऱ्या मोनिकाला नवे हात मिळावेत यासाठी तिच्या वडिलांनी खूप धडपड केली. २०१८ मध्ये ग्लोबल रुग्णालयात (Global Hospital)  हात प्रत्यारोपणासाठी नावही त्यांनी नोंदविले. तिच्या अपघातानंतर पहिल्या शस्त्रक्रियेच्या वेळेस लक्ष देत तिच्या वडिलांनी काळजी घेतली होती. जानेवारी २०१९ मध्ये त्यांचे निधन झाले. आता तिची आईच सारी धडपड करत आहे.

चेन्नईच्या रुग्णालयात तरुण मेंदूमृत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मृत्यूपश्चात त्याचे हात दान केले. गुरुवारी रात्री १०.४० वाजता चेन्नईहून ग्रीन कॉरिडॉरने हात मुंबईत आणले गेले. गुरुवारी रात्री उशिरा सुरू झालेली ही शस्त्रक्रिया शुक्रवारी संध्याकाळी पूर्ण झाली. ग्लोबल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ.नीलेश सातभाई यांच्या नेतृत्त्वाखाली १२ डॉक्टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली आहे.