sanjay londhe

सुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ लोककलावंत गायक शांताबाई फेम संजय लोंढे (Sanjay Londhe To Join Rashtrawadi Congress)यांचा देखील राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

    मुंबई : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर(Surekha Punekar In Rashtrawadi) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १६ सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ लोककलावंत गायक शांताबाई फेम संजय लोंढे (Sanjay Londhe To Join Rashtrawadi Congress)यांचा देखील राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

    शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत
    शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश येत्या १६ तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीत करणार आहेत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार कलाकारांकरिता काम करण्याची इच्छा संजय लोंढे यांनी बोलून दाखवली आहे. संजय लोंढे यांचे ‘शांताबाई’ हे गीत भन्नाट लोकप्रिय आहे. त्यानंतर त्यांना गाण्याच्या, कार्यक्रमाच्या अनेक सुपाऱ्या मिळाल्या.

    आणखी १२ कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
    लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १६ सप्टेंबरला प्रवेश करणार आहेत. त्याचवेळी आणखी १२ कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली आहे. पुणेकरांचा नटरंगी नार हा त्यांचा कार्यक्रम राज्यभरात सगळीकडे गाजला. या रावजी तुम्ही बसा भावजी, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, कारभारी दमाने या त्यांच्या लावण्या लोकप्रिय आहेत. तर ‘शांताबाई’ हे गीत लोकप्रिय करणारे संजय लोंढे पुण्यातल्या गरीब कुटुंबातून आले आहेत. सध्याही गरिबीत दिवस व्यतित करणाऱ्या या जातीवंत कलाकाराला राजकारणात येऊन कलावंतांसाठी काम करण्याची इच्छा आहे म्हणून ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.