गृहमंत्री पदाचा कारभार हातात घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील म्हणतात… 

गृहमंत्री म्हणून सहकारी पक्षांकडून कोणताही दबाव असण्याचे कारण नाही असे सांगत ते म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्र निर्णय घेत असतात त्यामुळे मला वाटत नाही काही अडचण येईल. राज्यात पोलीस आधिका-यांमध्ये विरोधीपक्षांशी निष्ठा असणा-या अधिका-यांवर काय कारवाई करणार असे विचारले असता ते म्हणाले की, मी आजच कार्यभार स्वीकारला आहे येत्या काही दिवसात सचिव अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. त्यानंतर आवश्यक असेल त्यानुसार निर्णय घेतले जातील.

    मुंबई : राज्याचे नवे गृहमत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी आज दुपारी कार्यभार स्विकारला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, गृहविभाग हा काटेरी मुकूट समजला जातो, येथे  रोज नवीन नवीन घटनाना सामेर जावे लागत असते. मात्र, त्याबाबत पोलीस दलाबद्दल लोकांना विश्वास वाटेल असा पारदर्शक स्वच्छ कारभार करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. मागील काळात काय चूका झाल्या त्यांची माहिती मी घेणार असून त्या दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

    गृहमंत्री म्हणून सहकारी पक्षांकडून कोणताही दबाव असण्याचे कारण नाही असे सांगत ते म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्र निर्णय घेत असतात त्यामुळे मला वाटत नाही काही अडचण येईल. राज्यात पोलीस आधिका-यांमध्ये विरोधीपक्षांशी निष्ठा असणा-या अधिका-यांवर काय कारवाई करणार असे विचारले असता ते म्हणाले की, मी आजच कार्यभार स्वीकारला आहे येत्या काही दिवसात सचिव अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. त्यानंतर आवश्यक असेल त्यानुसार निर्णय घेतले जातील.

    विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर सध्या आरोप होत आहेत त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मी आता पदभार स्विकारला आहे त्यामुळे यावर जास्त भाष्य करणार नाही, मात्र कोण काय आरोप करत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वळसे पाटील म्हणाले की,दैनंदिन दिवसामध्ये छोट्या-मोठ्या गुन्हाचे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी मी एक स्वतंत्र व्यवस्था करणार आहे. काल न्यायालयाने जो निर्णय दिला त्यामध्ये सर्व यंत्रणांना राज्य सरकारचे सहकार्य राहील.  कालच्या निकाला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आव्हान देणार आहे असेही ते म्हणाले.

    ते म्हणाले की काल अनपेक्षीतपणे माझ्या नेत्यांनी मला बोलावून ही नवी जबाबदारी देण्याचा निर्णय सांगितला. त्याबाबत मी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देतो. हे पद एक अवघड आणि आव्हानात्मक आहे. कोरोनामुळे सर्व पोलीस रस्त्यावर आहेत. कोरोनाच्या काळात जी बंधन घातली आहे त्याची अंमलबजावणी करणे ही सुद्धा जबाबदारी पोलिसांवर आहे.