मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर आता नाना पटोलेंनी केली सारवासारव, म्हणाले की…

नाना पटोले यांनी आपल्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाळत ठेवली जात असल्याचं बोलण्यात येत आहे. तसेच या मुळे राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या नाना पटोले यांच्याकडून या प्रकरणात सारवासारव करण्यात येत आहे. नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, मी बोललो हे खरं आहे. पण मी राज्य सरकारला नाही, तर केंद्र सरकारला उद्देशून म्हटलं होतं. तसेच माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर लोणावळ्यात आयोजित एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांसमोर गंभीर आरोप केल्याची एक व्हिडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडिओ क्लिपमध्ये नाना पटोले यांनी आपल्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाळत ठेवली जात असल्याचं बोलण्यात येत आहे. तसेच या मुळे राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

    पटोलेंची सारवासारव

    त्याच पार्श्वभूमीवर सध्या नाना पटोले यांच्याकडून या प्रकरणात सारवासारव करण्यात येत आहे. नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, मी बोललो हे खरं आहे. पण मी राज्य सरकारला नाही, तर केंद्र सरकारला उद्देशून म्हटलं होतं. तसेच माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलत असताना त्यांनी मुंबईत आल्यावर याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देईल असं म्हटलं आहे.

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पाया खालची जमीन सरकताना दिसून येत असल्याचं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना उद्देशून म्हटलं होतं. या प्रकरणात आता महाविकास आघाडी सरकारकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात महा विकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.