उद्धव ठाकरेंनंतर आता कंगनाचा शरद पवारांवर निशाणा, तर..,या शब्दांत आव्हाडांचे प्रत्युत्तर

कंगनाच्या खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरुन कंगना रणौतने आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडे (Sharad Pawar)  बोट दाखवलं आहे. तसेच इमारत शरद पवारांशी संबंधित असून आम्ही त्यांच्या पार्टनरकडून फ्लॅट विकत घेतला आहे. अशा प्रकारे ट्विटरच्या माध्यमातून कंगनाने  शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

 मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) पाली हिल येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेच्या (BMC) कर्मचाऱ्यांनी हातोडा चालवला. त्यानंतर कंगनाच्या खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरुन कंगना रणौतने आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडे (Sharad Pawar)  बोट दाखवलं आहे. तसेच इमारत शरद पवारांशी संबंधित असून आम्ही त्यांच्या पार्टनरकडून फ्लॅट विकत घेतला आहे. अशा प्रकारे ट्विटरच्या माध्यमातून कंगनाने  शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्विटच्या माध्यमातून कंगनाचा आता शरद पवारांवर निशाणा

ती नोटीस फक्त मला नव्हे तर संपूर्ण इमारतीला होती आणि ते प्रकरण फक्त माझ्या प्लॅटपुरतं नव्हे तर संपूर्ण इमारतीचं आहे. इमारत शरद पवारांशी संबंधित असून आम्ही त्यांच्या पार्टनरकडून फ्लॅट विकत घेतला आहे. त्यामुळे मी नव्हे तर ते उत्तर देण्यासाठी बांधील आहेत, असे कंगनाने ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

कंगनानं ट्वीट करत पुढे म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने कालपर्यंत मला कधीही नोटीस पाठविली नाही. खरं तर सर्व कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी मी स्वत: सर्व कागदपत्रं बीएमसीला दिली होती. बीएमसीसमोर किमान आपल्या धैर्याने उभे राहण्याची ताकत माझ्यात आहे. आता खोटं का बोलत आहेत? असा सवाल कंगनानं ट्वीटमधून केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाला तिचं नाव न घेता दिलं उत्तर

यासंदर्भात तिनं ट्वीट केल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाला तिचं नाव न घेता उत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. पण जिला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची अवस्था व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. तसेच आज पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेची आता ‘सोनिया सेना’ झाल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता कंगनाने शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.