jp nadda

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा येत्या १८ तारखेनंतर तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर(j.p. nadda Mumbai visit) येणार आहेत. याबाबत अधिकृत दौऱ्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा येत्या १८ तारखेनंतर तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर(j.p. nadda Mumbai visit) येणार आहेत. याबाबत अधिकृत दौऱ्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या(Mumbai corporation elction) पार्श्वभुमीवर नुकतेच हैद्राबादमध्ये भाजपने मुंसडी मारत विक्रमी जागा मिळवल्या होत्या.

भाजपच्या विजयानंतर शिवसेनेच्या तंबूत घबराट असल्याचे दिसून आले. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना मंत्र्याची बैठक घेवून मुख्यमंत्री ठाकरे यांनी हैद्राबादच्या पार्श्वभुमीवर मुंबईत काय तयारी करायची याचा आढावा घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष नड्डादेखील तीन दिवस थांबून मुंबईत पदाधिकारी संघटन आणि पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत.

या दौऱ्यात ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपशी मुंबई आणि राज्यात समविचारी पक्षांच्या नेत्यांना देखील भेटणार असल्याचे सांगण्यात येते. हैद्राबादनंतर आता पश्चिम बंगालच्या निवडणुकांवर भाजपने लक्ष वळवले आहे. या दौऱ्यावर असताना नड्डा यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने सध्या वातावरण तापले आहे, त्यामुळे मुंबईतदेखील नड्डा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप कडून वातावरण निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान भाजपचे आमदार राम कदम यांनी आज बंगाल बचाव, ममता हटाव आंदोलन करत जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या विषयावर जोरदार घोषणा बाजी केली. तर काल सायन येथे आ प्रसाद लाड यांच्या कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या निषेधाच्या घोषणा देत फलक झळकावले होते.