पून्हा कोरोनाचा धोका वाढतोय;  ठाकरे सरकारने पून्हा लॉकडाऊन स्थितीचे संकेत दिल्यानंतर लोकलबाबतही मोठा निर्णय होणार?

राज्यात पून्हा एकदा कोरोनाचा धोका वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात पून्हा एकदा निर्बंध कडक करावे लागतील असा थेट इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ठाकरे सरकारने पून्हा लॉकडाऊन स्थितीचे संकेत दिल्यानंतर लोकलबाबतही मोठा निर्णय होणार घेतला जाण्याची शक्यता आहे. तसे संकेतच मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत.

    मुंबई : राज्यात पून्हा एकदा कोरोनाचा धोका वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात पून्हा एकदा निर्बंध कडक करावे लागतील असा थेट इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ठाकरे सरकारने पून्हा लॉकडाऊन स्थितीचे संकेत दिल्यानंतर लोकलबाबतही मोठा निर्णय होणार घेतला जाण्याची शक्यता आहे. तसे संकेतच मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत.

    लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु केल्यानंतर१५ दिवसांचा कालावधी निरीक्षणासाठी ठेवला आहे. हा कालावधी येत्या २१ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसारच लोकलबाबतचा निर्णय घेतला जाईल”, असं सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे.

    मुंबईत सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लोकलबाबत नेमका काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास काही कडक निर्णय घेतले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

    मुंबई महापालिका आणि आजूबाजूच्या महापालिका विचारात घेऊन त्यासंदर्भातील शिफारस व माहिती राज्य सरकारला उपलब्ध करुन दिली जाईल. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे काकाणी यांनी सांगीतले. मुंबईची लोकल सुरू झाली म्हणून रुग्ण वाढले हे एकमेव कारण आहे असं म्हणता येणार नाही. हवाई वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मोजकी आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू होती, पण त्यांची संख्या आता वाढलेली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

    दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात पून्हा एकदा निर्बंध कडक करावे लागतील असा थेट इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत गंभीर आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल”, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून कोरोनासंदर्भात कठोर निर्णय घ्यावे लागताल असेही ते म्हणाले.