The Association of Resident Doctors read out the difficulties before Aditya Thackeray

राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याने आरोग्य सेवेवर ताण आला आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करून रुग्णसेवेचा आढावा घेतला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालरोग कोविड केअर वॉर्ड उभारण्याबाबतही चर्चा केली. याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली.

    मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याने आरोग्य सेवेवर ताण आला आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करून रुग्णसेवेचा आढावा घेतला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालरोग कोविड केअर वॉर्ड उभारण्याबाबतही चर्चा केली. याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली.

    महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने रुग्णालयांची क्षमता वाढवण्यात येणार आहे. याबाबत मुंबईत केलेल्या उपायांवर पालिकेच्या संबंधित अधिका-यांसोबत आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली. येणाऱ्या लाटेच्या शक्यतेनुसार आणि लोकसंख्याशास्त्राची पूर्वानुमान घेऊन आपण एक बालरोग कोविड केअर वॉर्ड तयार करू, असे सूचवल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    बालरोग कोविड केअर सेंटर सोबतच आता आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले आहे ते म्हणजे पालकांना कोविड केअर सेंटरमध्ये राहावे लागले आणि ज्या मुलांची देखभाल करण्यासाठी कोणी नसेल अशा मुलांसाठी साखळी रुपात कोविड केअर सेंटर तयार करणे, ज्यामुळे कोविड संसर्ग होणार नाही याबाबतही ठाकरे यांनी सूचवले असल्याचे सांगण्यात आले.