कोरोनाविरोधात आंदोलन करा; मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा

केंद्राकडून देखील तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दहीहंडी किंवा गणेशोत्सवाच्या काळात सर्तकता बाळगा, असे पत्र राज्य शासनाला दिले आहे असे सांगत यामुळेच महाविकास आघाडी सरकार हिंदुत्वविरोधी किंवा हिंदू सणांच्या विरोधात असणारे सरकार असल्याचा आरोपही ठाकरेंनी फेटाळला. यासोबतच नवीन सुविधा द्यायच्या नाहीत, परंतु जनतेची जीव धोक्यात घालून यात्रा काढायच्या हाच उद्देश विरोधकांचा उद्देश असल्याचा टोमणाही त्यांनी भाजपाला उद्देशून लगावला.

    मुंबई : कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जे नियम सांगितले आहेत, त्यांचे पालन करावेच लागेल, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. यात्रा काढून जनतेचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा कोरोनाविरोधात आंदोलन करा असा टोमणा त्यांनी मंदिरे उघडण्यावरून तसेच दहीहंडी उत्सवावर निर्बंध लादल्यामुळे आक्रमक असलेल्या विरोधकांना हाणला. ठाणे शहरातील ऑक्सीजन प्लांटचे लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

    केंद्राकडून देखील तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दहीहंडी किंवा गणेशोत्सवाच्या काळात सर्तकता बाळगा, असे पत्र राज्य शासनाला दिले आहे असे सांगत यामुळेच महाविकास आघाडी सरकार हिंदुत्वविरोधी किंवा हिंदू सणांच्या विरोधात असणारे सरकार असल्याचा आरोपही ठाकरेंनी फेटाळला. यासोबतच नवीन सुविधा द्यायच्या नाहीत, परंतु जनतेची जीव धोक्यात घालून यात्रा काढायच्या हाच उद्देश विरोधकांचा उद्देश असल्याचा टोमणाही त्यांनी भाजपाला उद्देशून लगावला.

    शिवसेना नेहमी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करते. तशी शिवसेनेची ओळखही आहे. परंतु, आज काही पक्ष 100 टक्के राजकारण करतात. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काही जणांना राज्यात यात्रा काढायच्या आहेत. जनतेचे प्राण धोक्यात घालून कार्यक्रम आयोजित करत आहे. हे मोठे दुर्देव आहे.

    - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री