इंपिरिकल डेटा तयार होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यावर सहमती : प्रा. हरी नरके

राज्यात 'जैसे थे' परिस्थिती ठेवल्यास त्याचा सर्वाधिक लाभ भाजपाला होणार आहे. आज तिथे भाजपची सत्ता आहे. केंद्राकडील तयार डेटा दाबून ठेवून, सर्वोच्च न्यायालयात वेळकाढूपणा करणाऱ्या मोदींना वाचवण्यासाठी फडणवीस फक्त राज्य मागास वर्ग आयोगाने जमवायच्या डेटावर चर्चा करीत सुटलेत.

    मुंबई: ओबीसी प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्याकडे सर्वपक्षीय बैठक पार पडली. राज्याचा इंपिरिकल डेटा तयार होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यावर सहमती दिसली. ५०% च्या मर्यादेत राहून २७% आरक्षण दिल्यास राज्यातील १६ जिल्ह्यांतील सुमारे २० हजार ओबीसी जागा कमी  होतील.

    मोदींना वाचवण्यासाठी फडणवीसांचे प्रयत्न

    राज्यात ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवल्यास त्याचा सर्वाधिक लाभ भाजपाला होणार आहे. आज तिथे भाजपची सत्ता आहे. केंद्राकडील तयार डेटा दाबून ठेवून, सर्वोच्च न्यायालयात वेळकाढूपणा करणाऱ्या मोदींना वाचवण्यासाठी फडणवीस फक्त राज्य मागास वर्ग आयोगाने जमवायच्या डेटावर चर्चा करीत सुटलेत.