Mumbai-Ahmedabad Tejas Express will also stop at Andheri

मुंबईहून अहमदाबादला जाणारी तेजस एक्सप्रेस अंधेरी स्थानकातही थांबणार असल्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केले. रविवारी मात्र, अहमदाबाद- मुंबई तेजस एक्सप्रेस अंधेरी स्थानकावर न थांबताच पुढे गेली. रेल्वेने या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.

    मुंबई : मुंबईहून अहमदाबादला जाणारी तेजस एक्सप्रेस अंधेरी स्थानकातही थांबणार असल्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केले. रविवारी मात्र, अहमदाबाद- मुंबई तेजस एक्सप्रेस अंधेरी स्थानकावर न थांबताच पुढे गेली. रेल्वेने या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.

    अहमदाबाद- मुंबई तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणारे ४२ प्रवासी अंधेरी स्थानकात उतरणारे होते. मात्र, ही ट्रेन अंधेरी स्थानकात थांबलीच नाही. यामुळे प्रवासी गोंधळे. ही बाब लक्ष्यात आल्यावर रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांनी दादर रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबण्यासाठी तातडीने व्यवस्था केली.

    मुंबईहून अहमदाबादला जाणारी तेजस एक्सप्रेस अंधेरी स्थानकातही थांबणार असून याबाबती माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली होती. मुंबईहून जाताना आणि येताना दोन्ही वेळेस ही ट्रेन अंधेरी स्थानकात थांबवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले. मात्र, हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून, 29 फेब्रुवारीपर्यंतच हा निर्णय लागू असेल असेही स्पष्ट करण्यात आलेय.