वित्तीय आणि कर मागदर्शन फिंटू (Fintoo) मंचातर्फे गुंतवणूकदारांसाठी AI-Advisor सुविधा

या मंचावर नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या AI-Advisor या नवीन पर्यायाआधारे ग्राहकांना त्यांचे वित्तीय नियोजन मानवी हस्तक्षेपाविना करण्यास मदत करणे हा हेतू आहे. या नव्या पर्यायात ग्राहकांची अर्थविषयक माहिती तसेच खासगी माहिती सुरक्षित ठेवली जाते. फक्त ग्राहकच त्याची माहिती पाहू शकतो, तिचे विश्लेषण करु शकतो आणि स्वतः योग्य निर्णय घेऊ शकतो.

  मुंबई : भारतातील वित्तीय आणि करविषयक मार्गदर्शन करणाऱा फिंटू (Fintoo) हा आघाडीचा मंच आता आपल्या ग्राहकांसाठी उत्तम डिजीटलविषयक सेवेचा अनुभव प्रदान करण्यास सज्ज झाला आहे. हा अनोख्या प्रकारचा वित्तीय आणि करबचत विषयक मंच हा प्रामुख्याने स्वयंचलित असे नियोजन करणारा मंच आहे. त्यात ग्राहकांचे उद्दिष्ट पूर्ण करणे, निधीची आवकजावक, निवृत्तीविषयक नियोजन, जोखीम, खर्चाचे व्यवस्थापन करणे आदी महत्वाची वैशिष्टे त्यात आहेत. आपली उद्दिष्टे आणि आपली संपत्ती यांचा एकमेकांशी व्यवस्थित ताळमेळ करणारे हे उत्तम साधन असून ते अतिशय सुनियोजितपणे गुंतवणूक करत जाते.

  या मंचावर नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या AI-Advisor या नवीन पर्यायाआधारे ग्राहकांना त्यांचे वित्तीय नियोजन मानवी हस्तक्षेपाविना करण्यास मदत करणे हा हेतू आहे. या नव्या पर्यायात ग्राहकांची अर्थविषयक माहिती तसेच खासगी माहिती सुरक्षित ठेवली जाते. फक्त ग्राहकच त्याची माहिती पाहू शकतो, तिचे विश्लेषण करु शकतो आणि स्वतः योग्य निर्णय घेऊ शकतो.

  नवीन सुविधा ही आगळीवेगळी असून ती केवळ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रीत करत नाही, तर अतिशय सखोलपणे नियोजन करते. त्यासाठी वापरकर्ता हा या मंचाला त्याच्याकडील निधीची आवक-जावक, जोखीम घेण्याची क्षमता, त्याचे उद्दिष्टे आणि करविषयक माहिती सादर करत हे सखोल वित्तीय नियोजन करु शकतो. सविस्तर अहवालांआधारे वापरकर्त्यास स्वतः च्या खर्चाची पातळी तपासणे, उद्दिष्टांचे वेळोवेळी अवलोकन करणे, संपत्तीचा आढावा घेणे, भविष्यातील निधीची आवक, प्रत्यक्ष कृती करण्यास मदत करतो आणि त्याआधारे अतिशय सहजरित्या स्वतःचे वित्तीय उद्दिष्ट पूर्ण करण्यास वेळोवेळी मदत करत जातो.

  अचानक आलेल्या महामारीच्या संकटाने अनेकांना नानाविध शाररीक, मानसिक आणि वित्तीय संकटांना सामोरे जावे लागत आहे. फिंटूचे संस्थापक आणि चीफ बिलीफ ऑफिसर सीए मशिष पी. हिंगर ( Hingar) नव्या सुविधेबाबत बोलताना म्हणाले की, सध्याच्या महामारीतुन वाटचाल करत असलेल्या लोकांच्या मदतीसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध मदतीची साधने विकसित केली आहे. वित्तीय व्यवस्थापनात आघाडीवर असलेल्या फिंटूनेसुध्दा एआय-ॲडव्हायझर या नवीन पर्यायाच्या विकासासाठी आपले सारे कौशल्य पणाला लावत ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला आहे. आमच्या ग्राहकांना वित्तीय व्यवस्थापनात अतिशय सर्वोत्तम सेवा पुरविणे हे आमचे सदैव उद्दिष्ट असून ते 100 टक्के पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेत आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांनी संपर्कविरहीत तसेच डिजिटल यंत्रणेच्या वापरावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. कंपनीच्या चॅटबॉट सेवेच्या माध्यमातूनही ग्राहकांना हव्या त्या वेळी वित्तीय बाबींबाबत सल्ला आणि मागदशन दिले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  AI-Advisor हा नवीन पर्याय सध्या वेबवरच उपलब्ध असून तो येत्या 30 जून 2021 पासून मोबाईलवरही उपलब्ध होणार आहे.

  महत्त्वाचे

  फिंटू हा सेबीकडे नोंदणीकृत झालेला गुंतवणूक सल्लागार मंच असून तो वित्तीय व्यवस्थापन, निवृत्तीसाठीचे नियोजन, कर व्यवस्थापन आदींबाबत सेवा पुरवितो. आता या मंचाने AI-Advisor ही नवीन सुविधा सुरु केली असून त्याआधारे कोणीही व्यक्ती मानवी हस्तक्षेपाविना स्वतःचे वित्तीय व्यवस्थापन करु शकते.

  नवीन सुविधेमागे वापरकर्त्याला आणि ग्राहकाला एका छताखाली सव पर्याय उपलब्ध करुन देण्याचा हेतु आहे. त्याआधारे स्वतःचे वित्तीय व्यवस्थापन करणे आणि मार्गदर्शन मिळविणे, निवृत्तीसाठीचे नियोजन करण्यास मदत करणे तसेच त्याला करबचतीसाठी विविध पर्याय सादर करणे हा या नवीन सुविधेचा उद्देश आहे.