Electrical lighting on two heritage buildings in Mumbai on the occasion of International Child Cancer Awareness Month

जागतिक वारसा श्रेणीमध्ये मोडणाऱ्या देशातील सर्वात जुने रेल्वेस्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्ससच्या (सीएसएमटी) मेकओव्हर प्लॅनवर लवकरच निर्णय होणार आहे. पीपीपी मॉडेल अंतर्गत विमानतळाच्या धर्तीवर सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी जाहीर केलेल्या निविदेत अदानी, गोदरेज, जीएमआर, कल्पतरूसह देशातील काही मोठ्या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. अंतिम बोलीनंतर ९ कंपन्या शॉर्ट लिस्ट करण्यात आल्या आहेत.

    मुंबई : जागतिक वारसा श्रेणीमध्ये मोडणाऱ्या देशातील सर्वात जुने रेल्वेस्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्ससच्या (सीएसएमटी) मेकओव्हर प्लॅनवर लवकरच निर्णय होणार आहे. पीपीपी मॉडेल अंतर्गत विमानतळाच्या धर्तीवर सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी जाहीर केलेल्या निविदेत अदानी, गोदरेज, जीएमआर, कल्पतरूसह देशातील काही मोठ्या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. अंतिम बोलीनंतर ९ कंपन्या शॉर्ट लिस्ट करण्यात आल्या आहेत.

    १६४२ कोटींच्या बहुद्देशीय प्रकल्पाचे काम इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (आयआरएसडीसी) देखभालीखाली सार्वजनिक आणि खासगी भागीदारी अर्थात पीपीपी मॉडेलअंतर्गत केले जाणार आहे.

    आयआरएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक एस. के. लोहिया यांच्यानुसार गेल्या जानेवारीत देशात १० मोठ्या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. त्यापैकी ९ कंपन्यांना योग्यतेच्या आधारावर शॉर्ट लिस्ट केले आहे. पुढील टप्प्यात लवकरच आयआरएसडीसी ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’वर क्वालीफाईड निविदाकारांची निवड करेल, असे ते म्हणाले.

    व्यवस्थापकीय संचालक लोहिया यांच्यानुसार सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी मास्टर प्लॅन अंतर्गत आणि सीएसएमटी, वाडीबंदर, भायखळा या तीन स्थानकांवर सुमारे २.५४ लाख चौ. क्षेत्रफळावर व्यावसायिक विकास करण्यात येणार आहे. शिवाय स्थानकाचे रिमॉडलिंगच्या माध्यमातून सबर्बन, लांब पल्ल्याच्या ट्रेनसह हार्बर मार्गावरील लोकलसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकावर सिटी सेंटर, रेल मॉल ‘रेलपॉलिस’ तयार करण्यात येणार आहे. हेरिटेज परिसर असल्यामुळे २५ मीटरहून जास्त उंचीवर इमारत बांधण्याची परवानगी नाही. इंट्रीग्रेटेड विकास, उपनगरीय फलाट, अंडर ग्राऊंड पार्किंग, आधुनिक टॅक्सी स्टॅण्ड, बस स्टॅण्ड आदी सुविधा असणार आहेत.

    प्रवाशांवर यूजर शुल्क

    रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासानंतर खासगी कंपनी आणि रेल्वेला महसुलाचे निरंतर स्त्रोत मिळणार आहे. स्थानकाच्या वाणिज्यिक संचालक तारीख (सीओडी) नंतर उपलब्ध होईल. निविदाकारावर स्थानकाचा पुनर्विकास आणि आसपासचा भूभाग वाणिज्यिक विकास करून ६० ते ९९ वर्षांपर्यंत संचालक आणि देखभालीची जबाबदारी असणार आहे. त्यासाठी प्रवाशांना यूजर शुल्क अदा करावे लागणार आहे.

    ‘या’ कंपन्या शॉर्ट लिस्ट

    सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी देशातील ९ कंपन्या शॉर्ट लिस्ट झाल्या आहेत. यामध्ये जीएमआर इंटरप्रायझेस, एशिया इन्फ्रास्ट्रक्चर, कल्पतरू पावर ट्रान्समिशन लि., एंकोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट होल्डिंग्स, अदानी रेल्वे ट्रान्सपोर्ट, ब्रुकफील्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड, मोरिबस होल्डिंग्स पीटीई लि., गोदरेज प्रा आणि ओबेरॉय रिअल्टी लि. या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांची कमीत कमी वार्षिक उत्पन्न ८२१ कोटी आहे, त्यांचाच यामध्ये समावेश करण्यात आला आहे. शिवाय कन्सट्रक्शन, ऑपरेट अॅण्ड मॅनेजमेंट यांचाही या कंपन्यांना अनुभव आहे.

    वर्ल्ड क्लास बिझनेस हब

    सीएसएमटी स्थानक परिसराला जागतिक स्तरावर प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एक व्यावसायिक हबच्या रुपात विकसित करण्याची योजना आहे. यासाठी आयआरएसडीसीने केंद्राकडून मंजुरी घेतली आहे. मंुबईसह दिल्ली, चंदीगढ, नागपूर आणि तिरुपती रेल्वेस्थानकांचाही कायापालट करण्यात येणार आहे.

    ५० हजार कोटींची गुंतवणूक

    पीपीपी अंतर्गत देशातील सुमारे १२३ मोठ्या स्थानकांचा विकास करण्याची योजना आहे. या अंतर्गत ५० हजार कोटींची गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आयआरएसडीसीने १२३ पैकी ६३ स्थानकांच्या पुनर्विकासाचा आराखडा देखील तयार केला आहे.