‘आदिपुरुष’ सिनेमाचे पोस्टर
‘आदिपुरुष’ सिनेमाचे पोस्टर

मुंबई (Mumbai Mumbai):  मराठा योद्ध्यांच्या शौर्यावर आधारित ‘तान्हाजी’ या चित्रपटात प्रत्यक्ष तान्हाजीची भूमिका साकारून अभिनेता अजय देवगण याने चाहत्यांच्या मनावर वर्चस्व कायम केले होते. या चित्रपटाच्या अपार सफलतेनंतर अजयने पुन्हा एक आव्हानात्मक भूमिका साकारण्याचे ठरविले आहे. येत्या काही महिन्यातच अजय देवगण याचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अजय देवगणसुद्धा मुख्य भूमिका साकारणार आहे. यामध्ये सैफ अली खान हा रावणाची भूमिका साकारणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

एक इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे, अजय देवगण ‘आदिपुरुष’ या चित्रपटात भगवान शंकराची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत अजय देवगण किंवा चित्रपट निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी प्रभासने ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची घोषणा केली. त्यानंतर हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. प्रभास, सैफ आणि अजयला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहे. आता या चित्रपटासाठी निर्मात्यांनी अभिनेत्री कियारा अडवाणीला विचारले असल्याच्या चर्चा रंगल्या आहे.

काही दिवसांपूर्वी ओम राऊत यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे तर सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. तसेच हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षाकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.