ajit pawar and sunil tatkare

ईडीने जलसंपदा विभागाकडून कोकणातील सिंचन प्रकल्पांची माहिती मागवली आहे. तसेच येत्या २१ ऑक्टोबरला ईडीने काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठीही उपस्थित राहण्यासाठी जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना समन्स बजावले आहेत. या प्रकरणात ईडीने जलसंपदा विभागाकडे मागील २००९ पासूनचे वाढीव प्रकल्प खर्च मान्यता, टेंडर, आर्थिक व्यवहार यांनी माहितीही मागितली आहे.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ (difficulties increase) झाली आहे. कथित सिंचन घोटाला प्रकरणामुळे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने जलसंपदा विभागाला नोटीस धाडली आहे. यामुळे हे नेते पुन्हा गोत्यात सापडले आहे.

ईडीने जलसंपदा विभागाकडून कोकणातील सिंचन प्रकल्पांची माहिती मागवली आहे. तसेच येत्या २१ ऑक्टोबरला ईडीने काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठीही उपस्थित राहण्यासाठी जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना समन्स बजावले आहेत. या प्रकरणात ईडीने जलसंपदा विभागाकडे मागील २००९ पासूनचे वाढीव प्रकल्प खर्च मान्यता, टेंडर, आर्थिक व्यवहार यांनी माहितीही मागितली आहे. तसेच या प्रकरावर अधिकाऱ्यांची चौकशी (ED to probe into irrigation scam) करण्यात येणार आहे.

उपुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक जणांना महाविकास आघाडीच्या काळात सिंचन घोटाळ्यात क्लिन चीट दिली होती. एक वर्षांपूर्वी अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अजित पवार यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नव्हता. त्यामुळे हा खटला चालू शकला नाही. असे कोर्टात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. अजित पवार यांच्यासह इतर ६९ नेत्यांनाही राज्य सहकारी बँक प्रकरणात क्लिन चिट मुंबई पोलिसांनी दिली होती. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक अपराध आणि अन्वेषण विभागाने कोर्टात अहवाल सादर केला होता.

परंतु आता ईडीने पाठवलेल्या नोटीसमुळे उपमुख्यमंत्री गोत्यात आल्याचे म्हटले जात आहे. घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.