अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत; यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

अर्थमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

    मुंबई : अर्थमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

    यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्यात?

    मागील कित्येक वर्षांपासून बालसंगोपनाचे पैसे वाढलेले नव्हते. या कामाला 450 रुपये मिळत होते. आपण आता आम्ही हे वाढवून 1,125 रुपये केले. यासाठी किमान 2,500 रुपये मिळावेत अशी माझी इच्छा आहे. असा प्रस्ताव आम्ही पाठवलाय. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत. त्यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मदत केल्यास त्यांचीही साथ मिळेल, असं त्या म्हणाल्यात. तसेचं महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचायचं याचाच विचार आम्ही करत आहोत. सामान्य लोकांना ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी म्हटलं. तसेचं महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचायचं याचाच विचार आम्ही करत आहोत. सामान्य लोकांना ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

    दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या आरोपावर अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच यशोमती ठाकूर यांच्या या आरोपामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.