राज्यातील जुन्या वृक्षांसंदर्भात अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल

राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय रोपवाटीकेच्या माध्यमातून 'सह्याद्री देवराई' संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुंबई : निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड ( Tree planting ) व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वनविभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. शासकीय रोपवाटीकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांची लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ( Ajit pawar ) आज दिली आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’च्या वृक्षलागवडीसंदर्भातील विविध विषयांवरील बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवानिमित्त’ राज्यात ७५ विशेष रोपवाटिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय रोपवाटीकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

यावेळी या बैठकीत वनमंत्री संजय राठोड, सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिनेअभिनेते सयाजी शिंदे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर आणि इतर वन विभागाचे संरक्षण प्रमुख उपस्थित होते. राज्यात ७५ ठिकाणी फळझाडांच्या परसबागा फुलविण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमांतून अत्यंत जुनी झाडे शोधून तज्ज्ञ गटाच्या झाडांना ‘हेरीटेज’ म्हणून घोषीत करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले आहे.