अजित पवार नाराज नाहीत, काही माध्यमांनी पसरवलेल्या अफवांवर शरद पवारांची नाराजी

मुंबई : भाजपाला राजीनामा देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (Aknath Khadse) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ncp) प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पाडला. एकनाथ खडसेंना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला. त्यांच्यासोबत अनेक खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्षे काढल्यानंतर एकाकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली. मात्र आजवर प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. असे खडसे म्हणाले. एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मी दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावेळी तेही म्हणाले की, नाथाभाऊ आता तुम्हाला इथे भवितव्य नाही. पक्ष बदलायचा तर बदला, राष्ट्रवादीत जा, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले.

मंत्रीमंडळ बदलांच्या चर्चांना शरद पवारांनी दिला पूर्णविराम

नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, असे गौरोद्गार काढतानाच नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला आहे.
तसेच अजित पवार नाराज नाहीत त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आराम करत आहेत. कोरोना संकटात काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच खबरदारीच्या उपाययोजनांसाठी काही नेते उपस्थित नाहीत, त्याचा चुकीचा अर्थ लावू नका, आपपाल्या कामात काही नेतेमंडळी व्यस्थ आहेत. तसेच काहींची प्रकृची खराब असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. खडसेंच्या येण्याने मंत्रीमंडळात कोणताही बदल होणार नाहीत. जयंतरावांच्या साथीला खडसेंच्या अनुभवाचा फायदा होईल. असे वक्तव्य करुन शरद पवारांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

शरद पवारांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे

आजचा दिवस आनंदाचा दिवस – शरद पवार

नवी पीढी राष्ट्रवादीकडे येण्यास उत्सुक

काही ठिकाणी संघटनेचं काम अधिक वाढवण्याची गरज आहे.

जळगाव, धुळे, नंदूरबार परिसरात अधिक काम करण्याची गरज आहे.

खान्देशातला सर्व परिसर हा काँग्रेस विचारांचा होता, गांधी, नेहरुंचे संस्कार होते

जळगाव हा निष्ठेने काम करणार जिल्हा आणि खान्देशी नेत्यांनी समाजासाठी आयुष्य दिलं

जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस विचारधारा कमकुवत करण्याचे काम एकनाथ खडसेंनी केले.

दोन टप्पे संपले, आता तिसरा टप्पा आला आहे.

नाथाभाऊंनी शब्द दिला म्हणजे ते मागे पुढे पाहत नाहीत.

आज हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिल्याशिवाय राहणार नाही.

अजितदादा नाराज नाहीत, कोरोना संकटात काळजी घ्यावी लागते.

खबरदारीच्या उपाययोजनांसाठी काही नेते उपस्थित नाहीत, त्याचा चुकीचा अर्थ नको

मंत्रिमंडळात कोणतेही बदल नाहीत.

जयंतरावांच्या साथीला खडसेंच्या अनुभवाचा फायदा होईल

मंत्रिमंडळ बदलांच्या चर्चांना शरद पवारांनी दिला पूर्णविराम