अजित पवार, नाना पटोलेंना मुख्यमंत्रिपदाची संधी;  रावसाहेब दानवेंनी हाणला टोमणा

महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून ओढाताण सुरू असल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे पाच नव्हे तर 25 वर्षे मुख्यमंत्रिपदी राहणार असल्याचे विधान करून विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, या मुद्याला पुन्हा एकदा भाजपाने हात घातला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी असून या तीन वर्षात अजित पवार यांनीही मुख्यमंत्री व्हावे, असा टोमणा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हाणला.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून ओढाताण सुरू असल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे पाच नव्हे तर 25 वर्षे मुख्यमंत्रिपदी राहणार असल्याचे विधान करून विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, या मुद्याला पुन्हा एकदा भाजपाने हात घातला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी असून या तीन वर्षात अजित पवार यांनीही मुख्यमंत्री व्हावे, असा टोमणा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हाणला.

    गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे लोक सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणेच महाविकास आघाडीतल्या पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, त्यांना कुणीतरी चावी देतो आणि मग ते केंद्र सरकार विरोधात टीका करतात असे रावसाहेब दानवे म्हणाले.

    मुख्यमंत्री होण्यासाठी पटोले आणि पवार यांच्याकडे तीन वर्षांचा काळ असून त्यानंतर 2024मध्ये भाजप स्वबळावर सत्तेवर आल्याने त्यांना संधी मिळणार नसल्याचेही दानवे म्हणाले.

    पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना अनेकजण चावी देत असतात. सल्ले देत असतात. त्यामुळेच सरकार चालो. दीड वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती. त्यामुळे तुमच्या सत्तेला टाळं लागले आणि आमच्या सत्तेचे टाळे उघडले. चावी आणि टाळे फार महत्त्वाचे आहे. ज्यांच्याकडे चावी असते ते कुणालाही टाळं लावू शकतात. आमच्याकडे चावी आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

    हे सुद्धा वाचा