अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका; निलेश राणेंची टीका

अजित पवारसाहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका शोभेल तुम्हाला, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. MPSC मार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे 31 जुलै पूर्वी भरण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती. आज 31जुलै आहे रिक्त पदे अद्याप भरलेली नाही. अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला, असं निलेश राणेंनी म्हटलं.

    मुंबई : स्वप्नील लोणकरच्या (swapnil lonkar) आत्महत्येनंतर एमपीएससीचा मुद्दा विरोधी पक्षाने जोरदार लावून धरला होता. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी एक घोषणा केली होती. 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरू, असं त्यांनी म्हटलं.

    दरम्यान 31 जुलै तारीख येऊन गेली आहे. मात्र अजित पवारांनी याच दिवसात नियुक्त्या देण्याची घोषणा केली होती. यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी एमपीएससीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

    निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

    अजित पवारसाहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका शोभेल तुम्हाला, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. MPSC मार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे 31 जुलै पूर्वी भरण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती. आज 31जुलै आहे रिक्त पदे अद्याप भरलेली नाही. अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला, असं निलेश राणेंनी म्हटलं.

    दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या या घोषणेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी एमपीएससीबाबत केलेली घोषणा खोटी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी याआधी केला होता.