Ajit Pawar pune covid centre decision

विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वॅब घेऊन काही आमदारांना रिपोर्ट न मिळाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. यामुळे अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वॅब घेऊन २४ तासाचा वेळ उलटला तरी रिपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे आम्हाला अधिवेशनात जाता येत नाही आहे.

मुंबई : राज्यात विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. सर्व आमदार आणि सदस्य अधिवेशनासाठी उपस्थित राहिले होते. परंतु आमदारांना प्रवेशाच्या अडचणींमुळे अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडसावले आहे.

यंदाचे पावसाळी अधिवेश हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी वेळात उरकण्यात येणार आहे. यामध्ये प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी चर्चा होणार नाही आहे. कोरोनामुळे अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या सर्व सदस्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक होते. त्यामुळेच विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या सदस्यांची चाचणी निगेटिव्ह असेल त्यांना अधिवेशनासाठी प्रवेश दिला जाणार होता.

विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वॅब घेऊन काही आमदारांना रिपोर्ट न मिळाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. यामुळे अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वॅब घेऊन २४ तासाचा वेळ उलटला तरी रिपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे आम्हाला अधिवेशनात जाता येत नाही आहे. सरकारनं काही एजंट ठेवले आहेत का? तसेच रिपोर्ट मिळेल का असे प्रश्न हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केले. तसेच हा प्रकार त्यांनी अजित पवार यांना सांगितला.

त्यामुळे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चागलेच खडसावले. आणि आमदारांचे रिपोर्ट ताबडतोब देण्याचे आदेश देत त्यांना आतध्ये सोडण्याचे आदेश दिले आहेत. थोड्यावेळात आमदारांना रिपोर्ट देण्यात आले आणि आतमध्ये सोडण्यात आले.