Will petrol-diesel become cheaper? What will the Mahavikas Aghadi government give to the people due to the mountain of debt and decline in revenue?

नविन घर खरेदी करताना ते घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाणार आहे. शाळेत येण्या जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस सेवा दिली जाणार आहे. केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी 1398 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा करण्यात आली. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना जाहीर करण्यात आली. कोरोना सारख्या परिस्थितीत घर काम करणाऱ्या महिलांची परवड होऊ नये तसेच त्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी ही योजना असणार आहे.

    मुंबई : जागतिक महिला दिना निमीत्ताने महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील महिलांना मोठं गिफ्ट दिले आहे. घर महिलेच्या नावावर असेल तर स्टॅम्प ड्यूटीत माफी मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. महिला सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पात विविध योजनांची घोषणा देखील करण्यात आली.

    अजित पवारांनी राज्यातील माताभगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्य. महिलांचा राज्यात 48 टक्के वाटा आहे.
    महिलांसाठी काही विशेष योजनांची घोषणा अजित पवारांनी केली.

    नविन घर खरेदी करताना ते घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाणार आहे. शाळेत येण्या जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस सेवा दिली जाणार आहे. केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी 1398 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा करण्यात आली. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना जाहीर करण्यात आली. कोरोना सारख्या परिस्थितीत घर काम करणाऱ्या महिलांची परवड होऊ नये तसेच त्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी ही योजना असणार आहे. 250 कोटींचे बीज भांडवलाची दरतूद.