अजित पवारांची तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती जप्त होणार; आयकर विभागाने दिली नोटीस

आयकर विभागाने अजित पवारांच्या अनेक मालमत्ता जप्त करण्य़ाची अस्थायी नोटीस बजावली आहे. यात राज्यीतल २७ मालमत्ता, गोव्यातील २५० कोटींचे रिसॉर्ट आणि ६०० कोटी रुपयांच्या एका साखर कारखान्याचा समावेश आहे. यात दिल्लीतीलही काही मालमत्ता आहेत.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर, आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाईच्य़ा तयारीत आणखी एक केंद्रीय यंत्रणा आहे. आयकर विभागाने अजित पवारांच्या अनेक मालमत्ता जप्त करण्य़ाची अस्थायी नोटीस बजावली आहे. यात राज्यीतल २७ मालमत्ता, गोव्यातील २५० कोटींचे रिसॉर्ट आणि ६०० कोटी रुपयांच्या एका साखर कारखान्याचा समावेश आहे. यात दिल्लीतीलही काही मालमत्ता आहेत.

    या मालमत्तेची एकूण किंमत १४०० कोटींहून अधिक आहे. आयकर विभागाने यापूर्वी अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी केली आहे. आत्ता ज्या जप्तीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, त्यात अजित पवारांच्या बहिणींच्या काही मालमत्ता आहेत. अजित पवारांच्या नातेवाईकांच्या छाप्यात १८४ कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरला आयकर विभागाने ७० ठिकाणी छापे घातले होते. यावेळी पार्थ पवार यांच्या मालकीच्या अनंत मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवरही छापा मारण्यात आला होता.

    कोणकोणत्या मालमत्ता होणार जप्त

    १. जरंडेश्वर साखर कारखाना- ६०० कोटी
    २. दक्षिण दिल्लीतील फ्लॅट – २० कोटी
    ३. पार्थ पवार यांचे निर्मल कार्यालाय- २५ कोटी
    ४. गोव्यातील निलय रेसॉर्ट- २५० कोटी
    ५. पुणे, मुंबईसह राज्यातील २७ जमिनी – ५०० कोटी

    अजित पवारांकडे ९० दिवसांचा अवधी

    या जप्तीच्या नोटिसा पाठवलेल्या मालमत्ता या बेनामी पैशांनी खरेदी केल्या नाहीत, हे सिद्ध करण्यासाठी अजित पवार यांच्याकडे ९० दिवसांचा अवधी आहे.