ajit pawar

इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची मागणी येते असताना  केंद्रानं हट्टाची भूमिका बाजूला ठेवून समंजस भूमिका घेतली पाहिजे. १०० टक्के सर्व गोष्टी आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा हे लोकशाहीत चालत नाही याची नोंद सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे असंही अजित पवार यांनी सूचीत केले.

मुंबई :  “शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी आंदोलनाबाबत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

कृषीविधेयक शेतकर्‍यांच्या फायद्याचे आहे असं केंद्रसरकारचे म्हणणे आहे. अस असत तर शेतकरी या कृषीविधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता,” असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या कायद्यांवर काय केले पाहिजे हे सविस्तर मांडलं आहे. केंद्रातील वरिष्ठ मंत्री शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. केंद्रसरकार विधेयकात काही प्रमाणात बदल करणार असल्याचे सांगत आहे. मात्र, काहीही स्पष्ट केलं जात नसल्याचेही अजित पवार म्हणाले.

कृषी कायदा रद्द करा अशी मागणी शेतकरी करत आहेत. यात विरोधी पक्षांना राजकारण करायचं नाही. आज थंडीच्या दिवसात शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात राज्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. तर मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकर्‍यांना घेऊन दाखल झाले आहेत असंही पवारांनी यावेळी सांगीतले.

इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची मागणी येते असताना  केंद्रानं हट्टाची भूमिका बाजूला ठेवून समंजस भूमिका घेतली पाहिजे. १०० टक्के सर्व गोष्टी आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा हे लोकशाहीत चालत नाही याची नोंद सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे असंही अजित पवार यांनी सूचीत केले.

दरम्यान, मागील दोन आठवड्यांपासून शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरु आहे. दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.