Bird Flu Alert : मुंबईकरांनो सावधान! कावळे, कबुतरांच्या मृत पावल्याच्या मुंबई महापालिकेकडे ५७८ तक्रारी

गेल्या ५ जानेवारीपासून मुंबईत कावळे व कबुतरे मृत पावल्याच्या तक्रारी पालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडे येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत ५७८ तक्रारी आल्या आहेत.

मुंबई : बर्ड फ्ल्यूबाबत आता मुंबईतही नागरिक जागरूक झाले आहेत. गेल्या ५ जानेवारी ते १४ जानेवारी सकाळपर्यंत कावळे, कबुतरे, चिमण्या मृत पावल्याच्या ५७८ तक्रारी पालिका आपत्कालीन कक्षातील १९१६ या हेल्पलाईनवर आल्या आहेत.

मुंबईतील मालाड, बोरिवली, कांदिवली, दादर, परळ, वडाळा, विक्रोळी, अंधेरी, सायन, माटुंगा, चेंबूर , गिरगाव, कुलाबा आदी भागात बर्ड फ्ल्यूमुळे कावळे, कबुतरे व दोन ठिकाणी चिमण्या मृत पावल्याबाबतच्या तक्रारी हेल्पलाईनवर आल्या आहेत.

गेल्या ५ जानेवारीपासून मुंबईत कावळे व कबुतरे मृत पावल्याच्या तक्रारी पालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडे येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत ५७८ तक्रारी आल्या आहेत.