rajesh tope

मुंबई : महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव केला आहे. परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात हाय अलर्ट घोषीत करण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचे विधान केले आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ल्ड फ्ल्यूने थैमान घातलं असून महाराष्ट्रातही याचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे या आजारानं मृत्यूमुखी पडले आहेत. सुरुवातीला पक्षांमध्ये संसर्ग होणाऱ्या या आजाराचा मानवी शरिरातही संसर्ग होतो.
या आजाराचा मृत्यू दर हा १० ते १२ टक्के आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषीत करणं गरजेचं आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.

मुरुंबा गाव बर्ड फ्ल्यू संसर्गित म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे या गावात कोंबड्यांचं सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धक विभागाचं पथक येथे तैनात आहे.

या गावाला प्रतिबंधक क्षेत्र म्हणूनही जाहीर करण्यात आलं असून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोंबड्यांची वाहतूक करण्यासही मनाई करण्यात आली आहे.