…म्हणून शिवसेनेसोबत जुळवून घ्या; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश

महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. अशी माहिती माझ्या कानावर आली आहे. पण, आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचे आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जुळवून घ्या", असे आदेशच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादीत बुधवारी मेगा भरती झाली. भाजपच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यांनतर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना केल्या आहेत.

महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. अशी माहिती माझ्या कानावर आली आहे. पण, आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचे आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जुळवून घ्या”, असे आदेशच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांसोबतही चर्चा केली. पराभूत उमेदवारांना कशामुळे कमी मतदान झालं? त्यामागची कारणं काय आणि भविष्यात काय करता येईल? यावर बैठकीत सविस्तर चर्चा. तसेच पराभूत उमेदवारांना पक्षात नवी भूमिका देऊन त्यांचा हुरुप वाढविण्याचा प्रयत्न देखील राष्ट्रवादी करणार असल्याचे समजते.

या बैठकीला अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री उपस्थित होते.