ramdas aathawale

    मुंबंई : डोंबिवली येथील तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार(Dombivli gang rape case) प्रकरणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मानपाडा पोलिस ठाण्याला भेट दिली. साकिनाका बलात्कार प्रकरणापेक्षा डोंबिवलीतील प्रकरण गंभीर आहे. 33 आरोपींना फाशिीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली.

    राज्य सरकारकडून 10 लाखाची मदत केली जाणार आहे. मात्र, हे प्रकरण साकिनाका प्रकरणापेक्षा गंभीर असल्याने साकिनाका पिडीतेच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांची मदत सरकारने दिली होती. डोंबिवली प्रकरणातील पिडीतेलाही 20 लाखाची मदत करण्यात यावी असे मुख्यमंत्र्यांना मी सांगणार आहे.

    रिपब्लीकन पक्षाच्या वतीने आठवले यांनी पिडीतेच्या कुटुंबियांना एक लाखाच्या मदतीचा धनादेश दिला. डोंबिवलीकरांनीही पुढे येऊन पिडीतेच्या कुटुंबियांना मदत करावी असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.