प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबई, पुणे प्रमाणेच आता राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज त्यासाठी एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली.

मुंबई (Mumbai).  मुंबई, पुणे प्रमाणेच आता राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज त्यासाठी एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली.

आभासी पद्धतीने झालेल्या या बैठकीत देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानाहून सहभागी झाले होते. यासंदर्भातील सूचना डिसेंबर अधिवेशनात विनियोजन विधेयकाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती आणि त्यानुषंगाने आज ही बैठक झाली. मुंबई आणि पुण्यातील इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना ३९ हजार रूपये आणि ३० हजार रूपये अनुक्रमे याप्रमाणे विशेष भत्ता दिला जात होता. मात्र अन्य शहरांमध्ये तो केवळ ११ हजार रूपये इतकाच होता. देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले की, कोरोनाच्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात डॉक्टर्स आपले योगदान देत आहेत. त्यामुळे केवळ मुंबई, पुण्याला एक न्याय आणि अन्य जिल्ह्यांना दुसरा असे करता येणार नाही. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांसाठी एकच निकष लावण्यात यावा. देवेंद्र फडणवीस यांची ही मागणी अजित पवार यांनी तत्काळ मान्य केली आणि वित्त विभागाने प्रतिकूल अभिप्राय दिला असला तरी आपण त्यावर आदेश जारी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.