गुगल कोलमडले ; तासाभरानंतर सेवा पूर्ववत

जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात नेटिझन्सना अडचण येत आहे. डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत.

दिल्ली: इंटरनेट जगतात सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या गुगलची सेवा सोमवारी कोलमडली होती. फक्त गुगल सर्च इंजिन म्हणजेच google.com व्यवस्थित सुरू असल्याचे दिसत होते. गुगल सर्व्हिसेस अचानक ठप्प झाल्याने इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती. गुगलची ई-मेल – जीमेल सेवा आणि गुगल ड्राईव्ह कोलमडल्याने युजर्स हैराण झाले आहेत. सायंकाळी ४:५३ च्या सुमारास ठप्प झालेली ही सेवा तब्बल तासाभरानंतर पुन्हा सुरू करण्यात आली होती. भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला. दरम्यान, ‘गुगल’कडून यामागचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.

यूट्यूबही झाले होते विस्कळीत

गुगलसह यूट्यूबही विस्कळीत झाल्याची माहिती आहे. युजर्स हैराण झाले असून सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला. टि्वटरवर #YouTubeDOWN आणि #googledown ट्रेंड करत आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये आणि गुगलच्या सेवेवर परिणाम झाला होता. गेल्या २० ऑगस्टला जीमेल सात तास बंद होते. गुगल ड्राइव्ह, गुगल डॉक्स, गुगल कीप, गुगल च‌ॅट और गुगल मीट वापरताना युजर्संना समस्यांना सामोरे जावे लागले होते.