मुंबईतील सर्व दुकाने होणार सुरु, सम-विषम फॉर्म्युला केला रद्द

  • मुंबईत 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत सर्व दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी मुंबईतील दुकाने सम आणि विषम तारखेला सुरु असायची परंतु सुधारीत नियमावलीनुसार रोज दुकाने सुरु राहणार आहेत. अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. राज्यात सर्वात जास्त कोरोनाची प्रकरणे मुंबईत आढळली आहेत. कोरोनामुळे मुंबईत लॉकडाऊन केला आहे. सर्वत्र संचारबंदी केली आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासुन मुंबईत लॉकडाऊन आहे. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता. ‘मिशन बिगिन अगेन’ च्या अंतर्गत मुंबईत सम आणि विषम तारखेला दुकाने चालु करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मुंबई माहानगरपालिकेने अनलॉकच्या-३ च्या टप्प्यात मुबईतील सर्व दुकाने यापुढे रोज सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. 

मुंबईत ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सर्व दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी मुंबईतील दुकाने सम आणि विषम तारखेला सुरु असायची परंतु सुधारीत नियमावलीनुसार रोज दुकाने सुरु राहणार आहेत. अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी सुधारीत परिपत्रक जाहीर केले आहे. ५ ऑगस्टपासून मुंबईतील सर्व मॉल्स आणि व्यापारी संकुले उघडण्याची परवानगीही देण्यात आली आहे. परंतु सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

मुंबईसह उपनगरांत कोरोना रुग्णांची वाढ होण्याचा कालावधी मंदावला आहे. त्यामुळे रुग्णवाढीला काल ७६ दिवसावर गेला आहे. कोरोना मुंबईत नियंत्रणात येत असल्यामुळे सर्व दुकाने रोज सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मॉल्स सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. परंतु शाळा, कॉलेज आणि जिम, स्विमिंगपुल सुरु करण्यास परवानगी नाही. तसेच सिनेमागृहही बंदच राहणार आहेत. 

मॉल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मात्र त्यातील सिनेमागृह तसेच रेस्टॉरंट सुरु करण्याची परवानगी नाकारली आहे. मात्र होम डिलिव्हरीची परवानगी महापालिकेने दिली आहे. फूड कोर्टलाही होम डिलिव्हरीची परवानगी आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिला आहे. तसेच मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. गर्दी टाळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नियमांचे पालन झाले नसल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.