‘तुझे माझे’ न करता सर्वांनी एकत्र यावे; संभाजी राजेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

हा समाज दु:खी आहे. त्याला आता न्याय मिळाला नाही, तर जे काही होईल त्याला माझ्यासकट सर्व नेते मंडळी जबाबदार असतील. त्यामुळे या बाबतीत तुझे माझे न करता सर्वांनी एकत्र यावे

    मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. हा समाज दु:खी आहे. त्याला आता न्याय मिळाला नाही, तर जे काही होईल त्याला माझ्यासकट सर्व नेते मंडळी जबाबदार असतील. त्यामुळे या बाबतीत तुझे माझे न करता सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठीच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांचीही भेट घेतली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक सुरू
    छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक सुरू. यावेळी मंत्री अशोकराव चव्हाण, महाधिवक्ता कुंभकोनी आदी लोक उपस्थित आहेत.
    मुंबईत झालेल्या या भेटीनंतर संभाजीराजे यांनी माध्यमांसमोर या भेटीत झालेल्या चर्चाची माहिती दिली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.